Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
₹ | ₹ | ₹ |
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
₹ | ₹ | ₹ |
Reviews given by our clients about their tours.
To Choudhari Travels I Narayan Patil had Tulzapur with my family would like to give you feed back about our tour We are very happy with service give by choudhary yatra
Read More
KHUP CHHAN YATRA
Read More
सप्रेम नमस्कार . वि. वि. चौधरी यात्रा कंपनिशि मी व माझ्या कुटुंबाचे जुने / पुराने संबंध व नाते आहे. कंपनी विषय आम्हा सर्वांना एक आदर व आपुलकिची भावना आहे प्रेम आहे………….
Read More
चौधरी यात्रा कंपनीचा टूर नं.111 दि 17.02.2023 अतिशय सुंदर झाला असून सर्व अतिशय खुश समाधानी आहेत. या यात्रेकरूंनी कोल्हापूर येथे या टूर मधील टूर मॅनेजर ब्रिजमोहन राबडिया,ड्रायव्हर लादू नारायण चौधरी,आचारी महाराज छोटू गुजर व किचन स्टाफ यांना शाल श्रीफळ व प
Read More
चौधरी यात्रा कंपनी के यात्री खजियार में इंजॉय करते हुए मेनी सुजरलैंड
Read More
सर जेवण छान आहे यात्रा चे मॅनेजर प्रधान चौधरी छान आहे राहण्याची सोय चांगली आहे टूर 111 दिनांक 3/5/2023
Read More
मी १९ मे ते २९ मे २३ दरम्यान चौधरी यात्रा सोबत केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश व हरिव्दार हि यात्रा केली. उत्तम नियोजन व अनुभवी माणस यामुळे यात्रा सुखद आणी सुखरूप झाली…
Read More
Tour No.: 111, Tour Date: 08 June 2023, Seat: 6 मॅडम काल संध्याकाळी सात वाजता आम्ही संभाजीनगरला आलोत, तरीचौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. मधील सर्व कर्मचारी खूप चांगले होते त्यांनी खूप चांगली सेवा दिली, तसेच जेवणाची - राहण्याची खूप चांगली सोय केली.आचारी देखील
Read More
Dear Agrawal Sir (Aurangabd), Today early in the morning 1a.m. we all arrived at Aurangabad safely after our Ashtvinayak Darshan thanks. In event of 3 days ashtavinayak darshan we found your company services has been very nice. All team work are very
Read More
सुबोध अग्रवाल चौधरी जी आमची भारतीय योग संस्थान सिडको जिल्हा छत्रपती ची अष्टविनायक यात्रा छान झाली दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी रात्री दीड वाजता आम्ही परत आलो यात्रा एकदम छान झाली चौधरी यात्रा कंपनी आणि आपले आभार धन्यवाद
Read More
एकेकाळची नामांकित यात्रा कंपनी चौधरी यात्रा कंपनी. आता अनेकानेक आल्या पण सर्व लोकांना चिरपरिचित असलेली संबंध राज्यातली एकमेव सुप्रसिध्द अशी चौधरी यात्रा कंपनी.
Read More
चौधरी यात्रा कंपनी आयोजित चारधाम यात्रेला नुकतेच जाऊन आलो. ही यात्रा जरी खडतर असली तरी योग्य नियोजन आणि नम्र स्टाफ यांमुळे यात्रा निर्विकारपणे पार पडली. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गाडी बरोबर असणारी किचन व्यवस्था. कुठल्याही प्रकारचे स्पाईशी, तेलकट नसलेले
Read More
टुर नंबर 6 यात्रा दिनांक 25/10/2023 यात्रा चांगली आहे, मुक्काम ठिकाणी रूम चांगल्या आहेत, जेवणाची पण सोय चांगली आहे, कंपनी स्टाफ पण चांगला आहे यात्रा चांगली आहे. यात्रेकरू -श्री मुकुंद खडकीकर बीड
Read More
आम्ही २४ फेब्रुवारी ते ५ मार्च सिंगापुर..थायलंड.. मलेशिया ट्रिप ला चौधरी यात्रा सोबत गेलो होतो...३६ जणांचा ग्रुप होता...खूप मज्जा आली...सुयोग्य नियोजन...सुबोध रायबोर्डे सरांसारखा डोक्यावर बर्फ असलेला मनमिळावू मॅनेजर..कितीही शंका ..प्रश्न विचारा त्यांचा आव
Read More
मी 3 मे 2023 ला चारधाम यात्रा आणी 1 जाने 2024 ला गुजराथ टूर चौधरी यात्रा मधुन केली आहे सर्व व्यवस्था उत्तम असते. कसलच टेंशन नाही
Read More
चौधरी यात्रा कंपनीची कोणतीही यात्रा करा!सुखद अनुभव नक्किच येईल. मी स्वतः ३-४ वेळा अनुभव घेतला.यातरा नाशीक वरून निघते व नाशीकलाच संपते. आपल्याला नाशीकलाच जावे लागते प्रोग्राम पाहून.
Read More
सर्व सन्मानिय सदस्य, देवदेवतांचा, वडीलधारी मंडळींचा आशिर्वाद, कमी वेळात अष्टविनायक यात्रा सटाणा येथून उत्तम नियोजन, आणि सर्वांचे उत्तम सहकार्य त्यामुळे आपली ट्रिप निर्विघ्न पार पडली. सर्वांनी ही यात्रा खूप एन्जॉय केली. बिरारी परिवारातील बहिण, मेहुणे आणि उ
Read More
टुर एकदम मस्त झाली तुमच्या सर्व कर्मचऱ्यांनी अतिशय उत्तम सेवा दिली व यात्रेतील इतर सहप्रवाशी देखील खूपच मनमिळाऊ व प्रेमळ होते ##एक अस्मरणीय अनुभव❣️⛳⛳
Read More
आमची अष्टविनायक यात्रा आज पूर्ण होणार आहे चौधरी यात्रा कंपनीने अतिशय सुंदर सेवा दिली उत्तम जेवण , राहण्याची व्यवस्थाही छान ...प्रवासात यात्रेकरूंची काळजी घेतली जाते .. स्टाफ खूप सजग आणि विनम्र आहे . धन्यवाद
Read More
.....आभार पत्र..... दि.२५ ऑक्टोबर २०२४ प्रति, मा.यात्रा प्रमुख चौधरी यात्रा कंपनी नाशिक विषय_ ' गुजरात दर्शन यात्रा ' मधील आलेले अनुभव...... सन्मा.महोदय,सस्नेह नमस्कार वि.वि. आपणास कळविण्यास आनंद वाटतो की,दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी MH15AK5055 या बसद्वारे नाशिक येथून मार्गस्थ झालेली गुजरात दर्शन यात्रा No.6 अत्यंत आनंददायी व सुखरुप संपन्न झाली. यात्रेदरम्यान आवश्यक चहापान, नाष्टा, जेवण उत्तम होते.यासाठी वापरलेला कच्चा माल उत्कृष्ठ प्रतीचा वाटला. चहा,नाष्टा, भोजन रुचकर तर होतेच,शिवाय दररोज वेळेत दिले गेले.आचारी व सर्व स्टाफ यांनी यात्रेकरुंची घरच्या कुटुंब सदस्याप्रमाणे काळजी घेतली. प्रत्येक ठिकाणी केलेली मुक्कामाची सोय अत्यंत उत्तम होती.आपण माहितीपत्रकात निर्देश केल्याप्रमाणे सर्व निसर्गस्थळे, तीर्थक्षेत्रे यांचे अचूक दर्शन घडविले.याकामी यात्रा व्यवस्थापक श्री.दलपतसिंग राठोड, बसचालक, आचारी व मदतनीस स्टाफ यांचे उत्तम सहकार्य लाभले. यापुढेही आपण सर्वच यात्रांचे असेच नियोजन कराल अशी अपेक्षा करतो.यापुढेही आपल्या यात्रेमध्ये आम्ही सर्वजण आनंदाने सहभागी होऊ अशा विश्वासाप्रत आपण उत्तम सेवा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा व सदिच्छा. आपला स्नेहांकित, डॉ.राजेंद्र कोबरणे.( सेवानिवृत्त प्राचार्य ) २५३५ इंद्रप्रस्थ, जैनस्थानकाजवळ राहुरीफॅक्टरी ता.राहुरी.जि.अहिल्यानगर पिन.४१३७०६ मोबा.8208923542/ 9404695455
Read More
वा! वा! प्रेक्षणीय स्थळे, भव्य मंदिरे, अल्हाददायक वातावरण, आरामदायी प्रवास, दिलखुलास मानसे .सर्वच काही खूपच छान. सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.
Read More
श्री महाजन साहेब, चौधरी यात्रा कंपनी. नमस्कार. मी आपल्या " चौधरी यात्रा कंपनी ( डोंबिवली -शाखा ) तर्फे सहल क्रमांक 65.( वाराणसी ते भुवनेश्वर ) या सहलीला दिनांक ११-११-२०२४. सहभागी होतो. वाराणसी ते भुवनेश्वर पर्यंतचा आमचा " प्रवास " अगदी व्यवस्थित, उत्तम प्रकारे, कुठेही घाई नाही, गडबड नाही कि गोंधळ नाही,का बोंबाबोंब नाही.का जेवणाची उणीव नाही. अगदी आमच्या टुर्स च्या मॅनेजरनी मिस्टर रामधन यांनी उत्तम प्रकारे हॅण्डल केलं.ना कोणावर रागावणे,ना कोणाला उलट बोलणं,ना कुणाशी वाद घालणं.प्रत्येकाशी आपुलकीने चौकशी करने हा त्यांचा गुणधर्म वाखाणण्याजोगा आहे,तो फारच मेहनती असून हार्ड वर्कर आहे.चहा/नाष्टा/ पाणी आणि जेवणाची कधीच हयगय नव्हती.जेवणाचे संयपाकी सुद्धा मनापासून आपापली कामे करत होती.कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती कि आळस नव्हता.बिचारे प्रेमाने,आपले पणाने आपापली कामे करत होती.तीही मन लावून जेवण वगैरे करीत होती. आमची " बस " चालविणारा ड्रायव्हर श्री.दिपक राय तर फारच जबाबदारीने आणि हेल्प फुल नेचरने चालवित होता.घाई नाही का ओवरटेक नाही.अगदी योग्य पद्धतीने बस चालवित होता.. त्यामुळे आम्ही रात्री बिनधास्तपणे बस मध्ये झोपू शकत होतो. १२-११-२०२४ तारखेला वाराणसीला सुरूवात झाल्यापासून ते दिनांक २९-११-२०२४ भुवनेश्वरला प्लेटफार्म नंबर ६ पर्यंतचा आमच्या सर्वांचा प्रवास आपल्या सर्वांच्या कृपेने आणि दिलेल्या सहकार्यामुळे अतिशय उत्तम आणि सुरक्षित झाला.आम्ही सर्व जण जेष्ठ नागरिक असूनही आम्हाला कोणताही आणि कसलाही त्रास झाला नाही.याचे सर्व Credit आपल्याला जाते.असो. तसेच श्री.महाजन साहेब आपले सुद्धा आभार मानावे तेवढे कमीच आहे.आपण आम्हाला सहल क्रमांक ६५ सुचविलात.तसेच बस मध्ये पुढची सिट दिल्या बद्दल आपले मनापासून आभार आणि आपणांस खुप खुप धन्यवाद. श्री .कांचन नार्वेकर ( डोंबिवली - पूर्व )
Read More
प्रति, मॅनेजर, अमरावती / नाशिक चौधरी यात्रा कंपनी. दि. 11.11.2024 ते 29.11.2024 पर्यंत आम्ही सहल क्रमांक 65 मध्ये सहभागी होतो. सहलीची व्यवस्था उत्तम होती. मॅनेजर श्री रामधन यांनी सर्व प्रवाश्यांची राहण्याची / जेवणाची / प्रवासाची उत्तम व्यवस्था केली. तसेच ड्राइव्हर, किचनमध्ये काम करणारे सर्व सहकारी आपापले काम अत्यंत मन लावून करीत होते. चौधरी यात्रा कंपनी द्वारे मी आता पर्यंत 4वेळा यात्रा केली आहे. श्री रामधन व त्यांचे सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार. संजय देशमुख, अमरावती.
Read More
प्रति, मॅनेजर, जळगाव / नाशिक चौधरी यात्रा कंपनी. दि. 11.11.2024 ते 29.11.2024 पर्यंत आम्ही सहल क्रमांक 65 मध्ये सहभागी होतो. सहलीची व्यवस्था उत्तम होती. मॅनेजर श्री रामधन यांनी सर्व प्रवाश्यांची राहण्याची / जेवणाची / प्रवासाची उत्तम व्यवस्था केली. तसेच ड्राइव्हर, किचनमध्ये काम करणारे सर्व सहकारी आपापले काम अत्यंत मन लावून करीत होते. चौधरी यात्रा कंपनी द्वारे मी आता पर्यंत 4वेळा यात्रा केली आहे. श्री रामधन व त्यांचे सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार.
Read More
नमस्कारजी, आपल्या सुचने प्रमाणे सर्व यात्रा व्यवस्थित पार पडली कोठेही अडचण आली नाही, संपूर्ण स्टॉफ कडून खुपच सहकार्य मिळाले, गाडी सुद्धा छान होती प्रवासात कोठेच अडचण आली नाही , रूमची व्यवस्था व नाश्ता आणि जेवण वेळेवर व अत्कृष्ट प्रतीचे मिळाले , साईटवर श्री कांडेलकर सर व श्री संतोष यांनी सर्व गृप ला सांभाळून आणले , जीव्हाळा जपणारी माणस !! खरोखर आहेत आमची यांत्रा आनंदमयी झाली आज परतीच्या प्रवासाला निघत आहोत , आमची व आमचे सर्व नातेवाईकांची पुढील यात्रा चौधरी यांत्रा कंपनी मार्फतच !! धन्यवाद श्री निलेशराव बारी व परिवार जळगाव Mob 9421522992
Read More
Bus Department
Bus Department
Bus Department
Bus Department
Branch Manager
Tour Manager
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
04-01-2025 | ₹ 30765 | ₹ 22331 | ₹ 21675 |
21-01-2025 | ₹ 30765 | ₹ 22331 | ₹ 21675 |
24-02-2025 | ₹ 30765 | ₹ 22331 | ₹ 21675 |
यात्रा क्रमांक 1 - 80 चे प्रतीसीट रुपयात समाविष्ट सुविधा-
1. एक वेळ चहा, पोटभर नाश्ता, रात्री शुद्धशाकाहारी जेवण.
2. निवास व्यवस्था ही ट्रस्ट/बजट हॉटेलमध्ये नॉन एसी स्टॅण्डर्ड रुम अटॅच बाथरुम प्रमाणे राहिल.
3. साईडसीन करण्यासाठी एसी वाहन पार्किंगपर्यंत राहिल.
4. जाणे येणे प्रवास नॉन एसी वाहना/नॉन एसी रेल्वे (नॉन एसी सेकंड क्लास स्लिपर) प्रवास राहिल.
यात्रा क्रमांक 80A - 80B चे प्रतीसीट रुपयात समाविष्ट सुविधा-
1. एक वेळ चहा, पोटभर नाश्ता, रात्री शुद्धशाकाहारी जेवण.
2. निवास व्यवस्था ही ट्रस्ट/बजट हॉटेलमध्ये नॉन एसी स्टॅण्डर्ड रुम अटॅच बाथरुम प्रमाणे राहिल.
3. साईडसीन करण्यासाठी नॉन एसी वाहन पार्किंगपर्यंत राहिल.
4. जाणे-येणे किंवा दोनी बाजूचा प्रवास नॉन एसी वाहनाने / नॉन एसी रेल्वे (नॉन एसी सेकंड क्लास स्लिपर) प्रवासने राहिल.
यात्रा क्रमांक 81A - 156 चे प्रतीसीट रुपयात समाविष्ट सुविधा-
1. एक वेळ चहा, पोटभर नाश्ता, रात्री शुद्धशाकाहारी जेवण.
2. निवास व्यवस्था स्वतंत्र स्टॅण्डर्ड रुम ट्रस्ट/बजट हॉटेल/सामुहिक स्वरुपाची राहिल.
3. साईडसीन करण्यासाठी नॉन एसी वाहन पार्किंगपर्यंत राहिल.
4. जाणे येणे प्रवास नॉन एसी सिटींग वाहन व रेल्वे (नॉन एसी सेकंड क्लास स्लिपर)ने राहिल.
कंपनीच्या बसमधील सीट आरक्षण प्रतिसीट भाडे नियमावली
यात्रेकरुंच्या आरामदायी प्रवासासाठी कंपनीच्या बसमधील सर्वच सीट आधुनिक तंत्रज्ञानयुक्त व चांगल्या बांधणीचे आहे त्यामुळे यात्रेकरुंना थकवा/त्रास न जाणवता सर्व प्रवास सुखकर होतो. 1 एप्रिल 2013 पासून कंपनीच्या बसमधील सीट आरक्षण पद्धतीत कंपनी व्यवस्थापनाने पुढील प्रमाणे चार भागांमध्ये विभागणी केलेली आहे.
1) प्रिमियम रांग - बसमधील सुरूवातीच्या A to D ही रांग
2) रेग्युलर रांग - बसमधील प्रिमियम रांगेनंतरच्या रांगा
3) सेमी इकॉनोमिकल रांग - Y क्रमांकाची रांग म्हणजे शेवटच्या रांगेच्या अगोदरची रांग,
4) इकॉनोमिकल रांग - Z क्रमांकाची
रांग म्हणजे बसमधील सर्वात शेवटची रांग.
याप्रमाणे उपरोक्त रांगांची प्रतिसीट भाड्याव्यतिरीक्त कमी/जादा रक्कम खालीलप्रमाणे राहील.
कंपनीच्या बसमधील सीट प्रकार वाढ/सवलत
दर कमालवाढ/सवलत
दर
1) रेग्युलर रांगेत सीट पाहिजे असल्यास - रेग्युलर
प्रतिसीट भाडे
2) प्रिमियम रांगेत सीट पाहिजे असल्यास 5%
जादा रू.500/-
पर्यंत
3) सेमी इकॉनोमिकल रांगेत सीट मिळाल्यास 2.5%
सवलत रू.250/-
पर्यंत
4) इकॉनोमिकल रांगेत सीट मिळाल्यास 5%
सवलत रू.500/-
पर्यंत
टिप : 4 दिवसापेक्षा जास्त बस प्रवास असणाऱ्या यात्रेसाठीच हा नियम लागू आहे.
सुचना * कोणत्याही यात्रेत यात्रेकरुंचे एकच सिट असेल किंवा दोन सीटच्या जोडी व्यतिरीक्त अधिक एकच सिट असेल व त्यांना सिंगल सिटसाठी विंडो सिट पाहिजेच असल्यास प्रतिसीट भाड्याच्या 5% जादा (कमाल मर्यादा रु.1500) रक्कम भरावी लागेल. * तरीही एखाद्या वेळेस कोणतेही कारण न कळविता यात्रेकरुंचे सीट नंबरमध्ये बदल करण्याचा अधिकार कंपनी व्यवस्थापनाने राखून ठेवलेला आहे.
* कंपनीचे इतर सर्व नियम व अटी लागू.
चौधरी
यात्रा कंपनी प्रा. लि. तर्फे आयोजित भारतातील यात्रांसाठी लागू असलेल्या सोयी, नियम व अटी.
A) हॉटेल /स्वतंत्र रुम यात्रांमधील निवास व्यवस्था
हॉटेल/स्वतंत्र रूम निवास व्यवस्थेच्या यात्रांच्या जाहिर प्रतिसीट भाड्यात निवाससोय ही दैनिक कार्यक्रमात नमुद असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणच्या सुमारे ५० कि.मी. परिसरात असते. कुटूंबात २/३/४ सदस्य असल्यास त्याच रुममध्ये सामुहिकरित्या रहावे लागेल. मुकामाच्या ठिकाणी एकाच इमारतीत किंवा जवळ उपलब्ध असलेल्या ठिकाणच्या इमारतीत कोणत्याही मजल्यावरील रुम्स् यात्रेकरुंना दिल्या जातात. परंतु त्या रुम्सचा दर्जा एकसारखा असेलच असे नाही. म्हणून असे रुम्स स्विकारुन तेथे यात्रेकरुंना मुक्काम करावाच लागेल. रुममध्ये टीव्ही, कुलर, हिटर, एसी या सुविधांचा समावेश नसतोच. हॉटेल/स्वतंत्र रुम निवास व्यवस्था असलेल्या यात्रांमध्ये संपुर्ण यात्रेमध्ये एक किंवा दोन रात्र देवस्थान ट्रस्टच्या यात्री निवास/गेस्ट हाऊस/भत निवास/ लॉज/ धर्मशाळा/ सर्वसामान्य हॉटेलमध्ये प्रत्येक कुटूंबासाठी अटेच बाथरुम डबल बेडसह वा काही ठिकाणी कॉट सिस्टम अनुसार वा काही ठिकाणी विनाबेडच्या बाथरुम अॅटेच नसलेल्या स्वतंत्र रूममध्ये असते. मात्र त्यापोटी फरकाचा परतावा मिळत नाही कारण प्रतिसीट भाडे त्यानूसारच आहे.
B) सामुहिक निवास व्यवस्थेच्या यात्रांसाठी
सामुहिक निवाससोय असलेल्या यात्रांच्या जाहिर प्रतिसीट भाड्यात निवाससोय ही यात्रीनिवास/देवस्थान ट्रस्टच्या भतनिवास/धर्मशाळा/मंगलकार्यालय इ.पैकी कोणत्याही मजल्यावरचे मोठ्या हॉलमध्ये, व्हरांड्यामध्ये, सामुहिक निवाससोय, सामुहिक बाथरुम, सामुहिक प्रसाधनगृह स्वरुपात केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी एकाच इमारतीत किंवा उपलब्ध असलेल्या ठिकाणच्या अन्य इमारतीत निवास सोय केली जाते.
C) एसी वाहन व्यवस्था असलेल्या यात्रांसाठी
D) नॉन एसी वाहन व्यवस्था असलेल्या यात्रांसाठी
प्रत्येक ठिकाणच्या सिटी साईटसीन हा ३×२ बस, जीप, लहान वाहन इ. प्रकारच्या वाहनानेच असतो, त्यामुळे सीट क्र.मागे-पुढे होतात व यात्रेकरुंना बुकींगच्या वेळी अॅलॉट केलेले सीट दिले जात नाही. यात्रेकरुंना सदर वाहनात मागे-पुढे कोठेही बसावे लागते, तसेच त्यामध्ये प्रवास एकदम लहान असतो. ज्या यात्रांमध्ये हरिद्वारपासुन बद्रीकेदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री असतात त्या बसेसची सीट कंपनीच्या बसेसपेक्षा कमी असतात त्यामुळे त्या बसेसची सीट अॅरेजमेंट कंपनी देत नाही व टूर मॅनेजर सांगतील त्या सीटवर यात्रेकरुंना प्रवास करावा लागेल. कोणत्याही वाहनामध्ये एसी, टीव्ही, व्हीडीओ, पुशबॅक सिस्टीम नसते. स्लिपर वाहनासाठी - दिवसाच्या प्रवासात वरील बर्थवरील यात्रेकरुंना खालील बर्थवर बसण्याचा व त्याचवेळी खालील बर्थच्या यात्रेकरुंना वरील बर्थवर झोपण्याचा अधिकार राहील. यासाठी कोणत्याही बर्थवरील यात्रेकरुंना मज्जाव करता येणार नाही. असे नको असल्यास त्या यात्रेकरुस १०% जादा प्रतिसीट भाडे द्यावे लागेल. दोन बर्थवर तिसर्या सीटचा समावेश झाला तर त्यास ७५% प्रतिसीट भाडे लागेल व त्यास रुममध्येही स्वतंत्र गादी मिळणार नाही. स्लिपर कोचद्वारे आयोजित यात्रांमध्ये विशेष परिस्थितीत स्लिपर बसऐवजी सीटर बस किंवा छोटे वाहन दिले गेल्यास प्रतिसीट दराच्या ५% कमाल रू.५००/- चा परतावा देण्यात येईल. स्लिपर बसमध्ये लोअर (खालचे) बर्थ हवे असल्यास प्रतिसिट रु.५००/- अतिरिक्त लागतील व अप्पर (वरचे) बर्थ घेतल्यास प्रतिसिट रु. ५००/- सवलत देण्यात येईल.
E) कंपनी आयोजित यात्रांमध्ये कंपनीच्या बस ऐवजी जेथे जेथे लोकल साईटसीनसाठी कंपनीतर्फे जीप, सुमो,मॅस,मिनीबस वा लहान वाहनाचा प्रवास जाहिर असेल तेथे त्या रिक्षा,जीप,सुमो, मॅस, मिनीबस अथवा लहान वाहनामध्ये जातांनाच्या प्रवासात पुढे बसलेल्या व्यतीस परतीच्या प्रवासात मागे बसावे लागेल. काही दर्शनीय स्थळांच्या स्थानिक प्रवासातील जीपमधील दहा व्यतींचा सामुहिक प्रवास भाडे खर्च कंपनीने समाविष्ट केलेला असतो. परंतू दहापेक्षा कमी व्यती त्यात बसल्यास न बसलेल्या व्यतींचा प्रवास भाडे खर्च बसलेल्या व्यतींना द्यावा लागेल. उदा. एका जीपमधील दहा व्यतींचे एकूण भाडे रू.२०००/- आहे त्यामुळे प्रतीव्यती रु. २००/- भाडे कंपनी देईल परंतु दहा ऐवजी सहा व्यतीच त्यात बसल्यास न बसलेल्या चार व्यतींचे प्रती रू.२००/- प्रमाणे एकूण ८००/- रुपये भाडे बसलेल्या सहा व्यतींना अदा करावे लागेल. तसेच सुरुवातीला पुढे बसलेल्या व्यतीने नंतर मागे बसण्यास नकार दिल्यामुळे इतर व्यती न बसल्यास कमी बसलेल्या व्यतींचे प्रवास भाडे रक्कम त्या बसलेल्या यात्रेकरुंना द्यावे लागेल.
F) सर्व यात्रेकरुंसाठी महत्त्वाची सुचना :
H) सर्व यात्रांच्या प्रतीसिट भाड्यात कंपनी तर्फे समाविष्ट नसलेल्या सोयी सुविधा
१) कंपनीचे माहितीपत्रक, आरक्षण अर्ज व यात्रेचा दैनिक कार्यक्रमात स्पष्ट नमूद असेल त्यापेक्षा इतर कोणत्याही सोयी-सुविधा.
२) पहिल्या दर्शनीय स्थळापर्यंतचा व शेवटच्या दर्शनीय स्थळानंतरचा रेल्वे,विमान,जहाज प्रवासात चहा, नाश्ता, जेवण तसेच रेल्वे स्टेशन, विमानतळ व बस पार्कींगपासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणे-येणेसाठी हमाली खर्च तसेच तिकीट असतांनाही रेल्वे/विमानाच्या लागु असलेल्या त्या-त्या वेळच्या नियमांची पुर्तता यात्रेकरुंकडून न झाल्यामुळे लागलेल्या दंडाचा खर्च.
३)
इतर कोणत्याही प्रकारचे वैयतीक खर्च. (उदा. मिनरल
वॉटर, औषधोपचार खर्च, वातानुकूलीत
यंत्रणेचा खर्च, कंपनीचे वाहन जाऊ देत नसेल अशा दर्शनिय स्थळापर्यंत
जाण्या-येण्याचा टॅसी, ऑटो खर्च तसेच धार्मिक विधी,दानधर्म, दर्शनिय
स्थळांची प्रवेश फी तिकीट, बोटींग, रोपवे, घोडा, डोली, कंडी-दंडी, रिक्षा, कुली, हमाली, लाँड्री, टेलिफोन, बसच्या बिघाडामुळे अथवा नैसर्गिक अनैसर्गिक तसेच
रेल्वे/विमान रद्द/लेट झाल्यामुळे केलेला जादा मुक्काम तसेच स्वइच्छेने कंपनीचे
जेवण न करता अन्यत्र हॉटेलचे जेवण, चहा, नाश्त्यासाठी केलेला खर्च इ.
I) यात्रेदरम्यान
जेवणाचे व अन्य नियम
1) साधारणपणे यात्रेेकरुंची निवास व्यवस्था एकापेक्षा जास्त ठिकाणी होत असते. मात्र एका यात्रेत किचन टीम एकच असल्याने जेवण एकाच ठिकाणी तयार होते व अशाप्रसंगी अन्य ठिकाणी निवासी असलेल्या यात्रेकरुंना जेवणाच्या ठिकाणी सामुहिक जेवणासाठी स्वखर्चाने यावे लागेल. दिलेल्या वेळेतच यात्रेकरुंना त्याठिकाणी पोहोचावे लागते. एखादे यात्रेकरु सामुहिक जेवणासाठी वेळेत न आल्यास किंवा इतर ठिकाणी जेवल्यास त्याचा खर्च कंपनीतर्फे देण्यात येत नाही. (रात्री १० नंतर कंपनीतर्फे जेवण/नाश्ता मिळत नाही याची नोंद घेऊन यात्रेकरुंनी या वेळेनंतर जेवणासाठी कंपनी कर्मचार्यास त्रास देऊ नये.)
2) सर्व प्रस्थान ठिकाणापासुन निघणार्या यात्रांची सुरुवात कंपनीची बस ज्याठिकाणाहुन निघेल त्याठिकाणी अथवा ज्या रेल्वे स्थानकाहुन असेल त्याठिकाणापर्यंत येण्याची व त्याठिकाणाहून आपल्या प्रस्थान ठिकाणापर्यंत जाण्याची व्यवस्था व खर्च यात्रेकरुंना स्वत:च करावा लागेल.
3) एखाद्या कोल्हापुरच्या यात्रेकरुंना पुणे रेल्वे स्थानकापर्यंत यायचे असेल तर त्यांना कोल्हापुर-पुणे यादरम्यानच्या साध्या बसचे भाडे मिळेल. घरुन कोल्हापुर बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि पुण्याला ज्याठिकाणी बस सोडेल त्याठिकाणाहुन रेल्वे स्थानकापर्यंत जाण्या-येण्याचा रिक्षाचा वा अन्य सर्व खर्च यात्रेकरुंना स्वत:च करावा लागेल.
4) यात्रा प्रवासात प्रत्येक यात्रेबरोबर एका बसमध्ये एकच टूर मॅनेजर असतो, त्याला यात्रेकरुंची निवास व्यवस्था, भोजन व इतर सर्व आपत्कालीन व्यवस्थांवर लक्ष ठेवावे लागते. यात्रेकरुंचा साईटसीन बर्याच वेळेस कंपनीच्या बसद्वारे असतो, काही ठिकाणी स्थानिक लहान वाहनाने, रिक्षाने,घोड्याने, डोलीने अथवा पायी प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत सदर टूर मॅनेजर यात्रेकरुंबरोबर साईटसीनला येणे शय होत नाही. विशेषत: वैष्णोदेवी,अमरनाथ, केदारनाथ, गिरणारे,यमुनोत्री यासारख्या यात्रेत बराचसा प्रवास हा पायी, घोड्याने, डोलीने व हेलीकॉप्टरने असतो. त्यामुळे साईटसीनमध्ये टूर मॅनेजर यात्रेकरुंसोबत नसतोच याची स्पष्ट नोंद घ्यावी.
5) बसमधील सीट क्रमांक यात्रेकरुंना कार्यालयात दाखविलेल्या चार्टप्रमाणे असतात. प्रत्यक्षात काही बसमध्ये आसन व्यवस्थेच्या क्रमांकात व कंपनीच्या चार्टमधील क्रमांकामध्ये फरक असतो. अशावेळेस कार्यालयात दिलेले आसन व्यवस्थेप्रमाणेच बसमध्ये सीट दिले जातील याची यात्रेकरुंनी नोंद घ्यावी.
J) एलटीसी लाभार्थी केंद्रीय/राज्य कर्मचार्यांना नम्र विनंती वजा सुचना..!
१) सदर माहितीपत्रकातील यात्रांच्या प्रतिसिट भाड्यात भोजन, निवास व प्रवासाची रक्कम समाविष्ट आहे. LTC सुविधा घेणार्या केंद्रीय/राज्य कर्मचार्यांना शासनाकडून फक्त प्रवासाची रक्कम मिळत असल्याने भारत सरकारच्या GMVN/ITDC च्या फक्त बसव्दारे निघणार्या यात्रांचे प्रतिसीट प्रवास भाड्याची पावती मिळते.
२) LTC लाभार्थी केंद्रीय व राज्य कर्मचार्यांना GMVN/ITDC चे ट्रॅव्हल सर्टीफिकेट व टिकीट हवे असल्यास त्यांनी नाशिक कॉर्पोरेट ऑफिसमधून सीट नंबर घेतांना तसेच बुकींग करतांनाच बुकींग अर्जासह करारनामा प्रतवर GMVN/ITDC चे ट्रॅव्हल सर्टीफिकेट व टिकीट पाहिजे असे स्वहस्ताक्षरात स्पष्टपणे लिहावे.
३) ज्या केंद्रीय/राज्य कर्मचार्यांना एलटीसीसाठी GMVN/ITDC चे किंवा अन्य स्टेट टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे तिकीट पाहिजे त्यास कंपनीच्या प्रशासकीय खर्चासाठी GMVN/ITDC च्या तिकीटाच्या रकमेची १०% रक्कम ही अतिरिक्त द्यावी लागेल.
४) एखाद्या LTC च्या यात्रेसाठी कमी सीटची बुकींग झाल्यास त्या यात्रेत GMVN/ITDC चे तिकीट अथवा सर्टिफिकेट कंपनीतर्फे दिले जाणार नाही. मात्र अशा यात्रेकरुंना त्यांच्याकडून न घेतले जाणारे उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे १०% रक्कम परत दिली जाते तसेच या अतिरिक्त १०% रक्कमेच्या तिप्पट, म्हणजे GMVN/ITDC तिकीटाच्या एकूण रकमेची ३०% रक्कम नुकसानभरपाई म्हणून त्या यात्रेकरुस दिली जाईल.
५) जशी MTDC ही महाराष्ट्र शासनाची, गढवाल मंडळ विकास निगम लि. (A Tourism Corporation of Uttranchal Govt.) ही उत्तरांचल शासनाची, तशीच ITDC ही भारत सरकारची अंगीकृत कॉर्पोरेशन आहे. त्यामुळे एखाद्या सरकारी कॉर्पोरेशनतर्फे एलटीसी यात्रेचा प्रवास केल्यास सरकारच्याच उपक्रमामार्फत प्रवास केला असे भारत सरकारच्या पर्सनल विभागाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे सर्वच सरकारी संस्थांचे एलटीसी ट्रॅव्हल तिकीट व रिसीट आपल्या कार्यालयात चालते का? आपल्या खात्यातर्फे GMVN/ITDC या सरकारी संस्थेचे ट्रॅव्हल तिकीट/रिसीट स्विकारायला काही अडचण आहे का? त्याचे शंका निरसन करणे. यात काही अडचण आल्यास किंवा काही खुलासा पाहिजे असल्यास यात्रेच्या प्रस्थानापुर्वीच तो विचारावा. सर्व शंकांचे निरसन झाले, असे कंपनीतर्फे गृहित धरण्यात येईल. याबाबत यात्रा संपल्यानंतर तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
K) रेल्वेने प्रवास करणार्या यात्रेकरुंसाठी नियम
१) कंपनीतर्फे यात्रेकरुंचा रेल्वे प्रवास हा नॉन एसी स्लिपर द्वितीय श्रेणीच्या (सेकंड लास) रेल्वे डब्याद्वारेच असतो. रेल्वे रिझर्वेशन रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाप्रमाणे १२० दिवस किंवा कमी जास्त कालावधीपेक्षा आधीच सुरु होत असल्याने रेल्वेने यात्रा करणार्या यात्रेकरुंनी किमान त्या-त्या वेळी लागू असलेल्या कालावधीपेक्षा अगोदर अथवा रेल्वे रिझर्व्हेशन नियमानुसार लवकर बुकींग केल्यास त्यांची रेल्वेची बर्थ आसन व्यवस्था (कन्फर्म रिझर्वेशन) करणे सुलभ होते. रेल्वे यात्रेमध्ये बुकींग करणार्या यात्रेकरुंना प्रतिसीट भाड्यात कंपनीकडून बर्थ कन्फर्मेशन तिकीट मिळते. परंतु विशेष अपरिहार्य परिस्थितीत (क्वचितप्रसंगी) RAC / वेटींग तिकीटावरही प्रवास करावा लागू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी त्याचप्रमाणे रेल्वेच्या रिझर्व्हेशन कन्फर्मेशनच्या परिस्थीतीनूसार रेल्वे प्रवास १/२ दिवस मागे-पुढे होऊ शकतो. याची तोंडी सुचना एक दिवस आधी दिली जाते आणि दिलेल्या सुचनेचे पालन करणे सर्व यात्रेकरुंवर बंधनकारक असते.
२) रेल्वेच्या सेकंड लास स्लिपर कोच ऐवजी एसी कोच किंवा विमानाद्वारे प्रवास करावयाचा असल्यास तशी माहिती आरक्षण अर्जात स्पष्ट लिहून तिकीटाची फरक रकम यात्रेकरुस बुकिंग करतांनाच भरावी लागेल, तरीही यदाकदाचित रेल्वेच्या एसी बोगीचे वा विमानाचे तिकीट न मिळाल्यास सेकंड लास स्लिपर बोगीमध्येच प्रवास करावा लागतो. कंपनीच्या जाहिर यात्रेत प्रथम दर्शनीय स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे एसीचे/विमानाचे तिकीट स्वत: यात्रेकरुंनी काढल्यास, यात्रेच्या प्रतिसीट भाड्यातून रेल्वे नॉन एसी सेकंड लास स्लिपरचे भाडे कमी घेण्यात येईल. मात्र कोणत्याही कारणास्तव असे यात्रेकरु प्रथम दर्शनीय स्थळी वेळेवर न पोहोचल्यामुळे त्या दर्शनीय स्थळाचे दर्शन न घडल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही.
३) यात्रांमध्ये असलेला रेल्वे प्रवास हा मुंबई/औरंगाबाद/पुणे/नाशिकरोड/मनमाड/जळगांव/ भुसावळ/नागपूर/ सोलापूर/बडोदा/ सुरत/अहमदाबाद/इंदोर इत्यादी कोणत्याही रेल्वे स्टेशन पासून सुरू होऊन तेथेच संपतो. रेल्वेप्रवास पहिल्या स्थानापासून ते शेवटच्या स्थानापर्यंत एका रेल्वेद्वारे किंवा टप्प्या-टप्प्याने (वेगवेगळ्या रेल्वेद्वारे)असू शकतो. रेल्वे प्रवास दोन टप्प्यात असल्यास एका स्टेशनपासुन दुसर्या स्टेशनपर्यंत येण्या-जाण्याचा लोकल वाहनाचा खर्च यात्रेकरुंना स्वत: करावा लागेल. रेल्वे प्रशासनाच्या त्या-त्या वेळी लागु असलेल्या नियमाप्रमाणेच रेल्वे प्रवास करणे यात्रेकरूंवर बंधनकारक आहे.
४) रेल्वे प्रवासादरम्यान चहा, भोजन, नाश्त्याची व्यवस्था कंपनीतर्फे नसते तर त्याची व्यवस्था स्वत: यात्रेकरुंनाच स्वखर्चाने करावी लागते तसेच रेल्वेस्टेशन/ एअरपोर्टवर संबंधीत रेल्वे उशिरा आहे त्या कारणासाठी यात्रेकरुंना त्या प्लॅटफॉर्मवरच वेटींग रुममध्ये वा योग्य ठिकाणी थांबुन त्या रेल्वेची वाट पहावी लागेल. त्यासाठी कंपनीतर्फे इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था अथवा जेवण, चहा, नाश्त्याचा कोठलाही खर्च कंपनीतर्फे केला जात नाही. रेल्वेचा प्रवास दोन वेगवेगळ्या रेल्वेने असल्यास कंपनीतर्फे फत रेल्वे तिकीट यात्रेकरुंना दिले जाते.
५) रेल्वे प्रवासासाठी कंपनीची जबाबदारी फत तिकीट देण्यापर्यंतच मर्यादित आहे. रेल्वे प्रवासात इतर कोणत्याही प्रकारची सेवा कंपनी देत नसल्याकारणाने कंपनीचा माणूस सोबत राहिलच असे नाही. रेल्वे प्लॅटफार्म व प्रवासात स्वत:च्या सामानाच्या हमालाचा खर्च यात्रेकरुंना स्वत:च करावा लागतो.
६) कंपनीतर्फे रेल्वेचे तिकीट जाण्याचे तिकीट अगोदर यात्रेकरुंना देण्यात येईल व परतीचे तिकीटदेखील निघण्याअगोदरच देण्यात येईल. मात्र दिलेल्या वेळेत यात्रेकरुंना स्वत: स्वखर्चाने रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे कोणत्याही कारणास्तव यात्रेकरु वेळेत रेल्वे स्टेशनवर न पोहोचल्यास व रेल्वे निघुन गेल्यास सदरहु संपुर्ण यात्रा अथवा रेल्वेचे तिकीट कॅन्सल झाल्यामुळे संपुर्ण यात्रेच्या खर्चासह कोणताही परतावा कंपनीतर्फे दिला जात नाही. फक्त रेल्वेचे तिकीट देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. जातांना रेल्वे प्रवास संपल्यानंतर रेल्वे स्टेशनपासुन ते नियोजित निवासस्थळी जाण्यासाठी लोकल वाहनाचा खर्च यात्रेकरुंना स्वत: करावा लागेल. त्याचप्रमाणे येतांना रेल्वे प्रवास संपल्यानंतरदेखील रेल्वे स्टेशनपासुन ते घरापर्यंत जाण्याचा खर्च यात्रेकरुंना स्वत:च करावा लागेल.
७) काही वेळेस रेल्वेतर्फे सांगण्यात आलेले प्लॅटफॉर्मऐवजी इतर प्लॅटफॉर्मवर रेल्वे येते. तसे झाल्यास ताबडतोब धावपळ करुन वा स्वखर्चाने हमाल करुन ज्या प्लॅटफार्मवर रेल्वे येण्याचे जाहिर झाले त्या प्लॅटफॉर्मवर पोहचून रेल्वेमध्ये बसण्याची जबाबदारी यात्रेकरुंची स्वत:ची आहे.
८) वरील कोणत्याही कारणांबाबत यात्रेकरुंचे कुठल्याही प्रकारचे शारिरीक/आर्थिक नुकसान झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी यात्रेकरुंची राहील कंपनीची नाही.
९) सर्व यात्रांसह खास रेल्वे यात्रांच्या यात्रेकरुंनी बुकींग करतांना किंवा यात्रा प्रस्थानाच्या ३ दिवस अगोदर यात्रेची प्रस्थान तारीख, वेळ, ट्रेन नंबर, रेल्वे स्टेशनचे नांव इत्यादी माहिती कृपया बुकींग कार्यालयात विचारणे.
१०) कंपनीतर्फे आयोजित होणार्या रेल्वे यात्रांमध्ये ज्या यात्रेकरुंना रेल्वे प्रवासाऐवजी विमान सेवा पाहिजे असल्यास त्याची सोय कंपनीतर्फे केली जाते. मात्र त्याची लेखी सुचना व फरकाची रक्कम बुकींग करतेवेळीच द्यावी लागेल. विमान तिकीटासाठी तिकीटाचा तसेच एअरपोर्ट ते पहिले ठिकाण/निवास ठिकाणापर्यंत जाणे-येणे खर्च यात्रेकरुंना स्वत: करावा लागेल.
L) कंपनीचे इतर जनरल नियम व अटी
1) माहितीपत्रकातील जाहिर यात्रेतील कंपनीतर्फे जाहिर केलेल्या तारखेची यात्रा ही निश्चितच निघते. फक्त सीट कमी असल्याकारणानेच कंपनीची भारतातील आयोजित यात्रा रद्द झाल्यास प्रत्येक यात्रेकरुस त्यांनी कंपनीत त्या यात्रेपोटी भरलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम भरपाई म्हणुन त्यास परत केली जाते. जाहीर यात्रा १/२ दिवस मागे पुढे गेली परंतु प्रभुकृपेने आजपर्यंत अशाप्रकारे कंपनीची यात्रा रद्द होण्याचा प्रसंग आलेला नाही. मात्र एखाद्या यात्रेत सीट कमी असल्यास यात्रेकरुंचे सीट नंबर बदलतात, वाहनाचा प्रकार बदलतो, वाहन सिटींग अॅरेजमेंट प्रकार बदलतो. कमी असलेल्या सीटची गाडी एखाद्या यात्रेला गेल्यास बदललेल्या सीटवर बसुन प्रवास करणे यात्रेकरुंना बंधनकारक आहे. मात्र या कारणासाठी प्रवास करायला नकार दिल्यास, यात्रेला न गेल्यास अशा यात्रेकरुंची कंपनीच्या कॅन्सलेशन नियमाप्रमाणे यात्रा रद्द केली जाते. एखाद्या यात्रेकरुंची यात्रा रद्द झाली म्हणजे कंपनीची यात्रा रद्द झाली असे समजण्याचे कारण नाही.
2) रेल्वे बर्थ कन्फर्म न मिळाल्यामुळे किंवा आयटीडीसीचे तिकीट मिळणार नसल्याकारणाने यात्रेकरुने स्वत: यात्रा रद्द केल्यास त्यापोटी कोठल्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत नाही व कॅन्सलेशनचे नियमाप्रमाणे यात्रा रद्द केली जाते.
3) विदेश यात्रांसाठी नियम क्र.१ व २ लागु नाही. विदेश यात्रांमध्ये सीटअभावी ठरलेल्या तारखेची यात्रा कंपनीची रद्द झाल्यास यात्रेकरुंना बुकींगपोटी भरलेल्या रकमेतून त्या यात्रेकरुंसाठी त्या यात्रेच्या व्यवस्थेपोटी झालेला खर्च वगळून उर्वरित रक्कमच परत दिली जाते. त्या रकमेच्या पाचपट रक्कम मिळणार नाही.
4) सुखकर आनंददायी प्रवासासाठी यात्रेकरुंनी सोबत आवश्यक तेवढेच जास्तीत जास्त १५ किलो वजनापर्यंतचे सामान त्यात प्रामुख्याने बेडशीट, चादर, सतरंजी, वॉटरबॅग, टॉर्च, नॉयलॉन दोरी, छोटे कुलूप, नऊ इंच उंचीची छोटीशी प्लॅस्टिक बादली, रोजचे घालण्याचे ड्रेस, नियमितची असणारी आवश्यक ती औषधे इ. सामान आणावे. त्यापेक्षा जास्त सामान आढळल्यास त्याचे वेगळे भाडे टूर मॅनेजर सांगतील त्या दराने तेथेच भरावे लागेल. यात्रेकरुंनी मौल्यवान दागिने, जडजवाहिर अथवा मोठी रोख रक्कम सोबत आणू नये. यात्रेकरुंनी आणलेले सामान स्वत: सांभाळावे, यात्रेकरुंचे सामान सांभाळण्याची जबाबदारी कंपनीची, यात्रा व्यवस्थापकाची राहणार नाही. व आपले सामान चोरी गेल्यास त्यास सर्वस्वी यात्रेकरुच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच यात्रा काळात जिवीत व वित्त हानीची जबाबदारी यात्रेकरुंचीच राहील. यात्रेदरम्यान यात्रेकरुंकडून कंपनीच्या बसेस किंवा निवासस्थान इत्यादी ठिकाणी नुकसान झाल्यास सदरची नुकसान भरपाई यात्रा आयोजक सांगतील, त्यादराने यात्रेकरुला त्याठिकाणीच भरून द्यावी लागेल.
5) यात्रेचे आरक्षण हे एकूण रकमेच्या ३५% रक्कम चौधरी यात्रा कंपनी प्रा.लि.,नाशिक नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बंकेच्या अकाऊंटपेयी डी.डी.ने वा चेकद्वारे करावे लागते. बाकी उर्वरित संपुर्ण रक्कम यात्रा निघण्याच्या ११ दिवस अगोदर कॅश किंवा २१दिवस अगोदर चेकने भरल्यावरच सीट नंबर व बुकींग ग्राह्य राहील. यापेक्षा कमी रक्कम भरुन बुकींग केली असली तरीही जेव्हा ३५% पैकी उर्वरित रक्कम भरली जाईल तेव्हा त्यानंतरच ती बुकींग ग्राह्य धरुन रेल्वेची बुकींग केली जाईल. कंपनीच्या कोणत्याही अधिकृत शाखेत बुकींगचे पैसे भरताना कंपनीची रितसर नंबर असलेली पावतीच यात्रेकरुंनी घ्यावी. कंपनीच्या अधिकृत रकम पावती व्यतिरित इतर रकमेस कंपनी जबाबदार राहणार नाही. यात्रेकरुंनी डी.डी. किंवा चेकनेच रक्कम भरावी. कंपनी रोख रक्कम/चेक/डी.डी./ आर.टी.जी.एस./ एन.एफ.टी./ पेटीयम यांनाच प्राधान्य दिले जाते. यात्रेकरुंनी एस.आर.ए. किंवा रिसिटवर कॉर्पोरेट ऑफिसचा (नाशिक) संगणक कोड असल्याशिवाय कागदपत्रं स्विकारु नये. संगणक कोड क्रमांक घेतल्यावरच आपली बुकींग ग्राह्य धरली जाईल हे आपणावर बंधनकारक राहील. यात्रा कालावधीत यात्रा सिट आरक्षण फॉर्म, रकम भरलेल्या पावत्या इत्यादी बुकिंगची सर्व मुळ ओरिजनल कागदपत्रे स्वत: जवळ बाळगणे यात्रेकरुस जरुरीचे आहे त्याशिवाय यात्रेत सहभागी होता येणार नाही. यात्रा प्रवासात कंपनी अधिकारी/ कर्मचारी यांनी मागणी केल्यास सदर कागदपत्रे दाखवणे बंधनकारक आहे.
6) ११ वर्षाखालील लहान मुलांचे सीट बुकींग करतांना जन्मदाखला सादर करणे आवश्यक आहे. यात्रेच्या दरम्यान बस, रेल्वे, विमान प्रवासात कम्पलसरी चेकींग होत असल्याने कोणत्याही यात्रांच्या प्रवासात स्वतःचा फोटो व वय असलेला शासनमान्य ओळखपत्राचा अशा प्रकारचा ओरिजनल कागदोपत्री पुरावा स्वत: जवळ प्रत्येक यात्रेकरुने बाळगणे जरुरीचे आहे. केंद्र व राज्य सरकारचा, रेल्वेचा विमान, स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर्शनीय स्थळांचा, मुक्कामाच्या ठिकाणचा त्या त्या वेळी लागु असलेले नियमाप्रमाणे फोटो आयडी व वयाचा पुरावा न बाळगल्याने होणार्या मानसिक, शारिरीक त्रासास व आर्थिक दंडास स्वत: असे यात्रेकरु जबाबदार राहतील.
7) प्रतिसीट भाड्यामध्ये कंपनीतर्फे रेल्वे/विमान/जहाज प्रवास सोडून फत त्या-त्या यात्रांच्या पहिल्या दर्शनीय स्थळापासून शेवटच्या दर्शनीय स्थळापर्यंतच्या बस प्रवासात एकवेळ महाराष्ट्रीयन, गुजराथी व राजस्थानी पध्दतीचे शुध्द शाकाहारी जेवण, नाश्ता व चहा असून सोबत ताट -ग्लास, गादी, सामुहिक निवाससोय अंतर्भूत आहेत. कंपनीतर्फे उपवास व्यवस्था गुरुवार, चतुर्थी, एकादशीलाच असते. यात्रेत कमी सीट असल्यास त्या-त्या दर्शनिय ठिकाणच्या स्थानिक हॉटेलचे जेवण यात्रेकरुंना दिले जाते. प्रवासात स्थानिक व्यवस्थेनुसार उपलब्ध पाण्याचाच वापर यात्रेकरुंना करावा लागतो. त्यामुळे यात्रेकरुना काही अपाय अथवा त्रास झाल्यास कंपनीची जबाबदारी राहणार नाही, तर यात्रेकरुंची स्वःतचीच जबाबदारी राहील. स्थानिक पिण्याचे पाणी पसंत नसल्यास यात्रेकरुंनी स्वखर्चाने मिनरल वॉटर घ्यावे. यात्रा सुरु होण्याच्या दुसर्या दिवशी सकाळपासून म्हणजे पहिल्या दर्शनिय स्थळापासुन ते शेवटच्या दर्शनिय स्थळापर्यंतच कंपनीची लॉजिंग-बोर्डिंग सुविधा असते. ज्या-ज्या यात्रांमध्ये रेल्वे/विमान/जहाज प्रवास आहे, त्या रेल्वे/विमान/जहाज प्रवासात कंपनीची भोजन व्यवस्था नसते तर यात्रेकरुंना स्वखर्चाने करावे लागते.
8) यात्रेदरम्यान यात्रेकरुस यात्रेचा आनंद हा मिळालाच पाहिजे यासाठी कंपनीचे व्यवस्थापन कायम प्रयत्नशील असते परंतु प्रवासात आनंद व त्रास ही एकाच गोष्टीची दोन रुपे असल्याची जाणीव ठेवून यात्रेकरुंनी अपरिहार्य परिस्थितीत थोडा त्रास सहन करुन यात्रा व्यवस्थापनास सर्वतोपरी सहकार्य करावे.
9) नैसर्गिक/अनैसर्गिक कारणास्तव नियोजित यात्रान गेल्यास रक्कम परत न करता आगामी त्याच यात्रेत यात्रेकरुंना ट्रान्सफर केले जाते. विशेष परिस्थितीत यात्रेचे स्थळ व प्रतिसिट भाड्यामध्ये बदल झाल्यास तो बदल यात्रेकरुंवर बंधनकारक राहील.
10) या अगोदरच्या माहितीपत्रकानुसार बुकिंग केलेल्या यात्रेकरुंना माहितीपत्रक क्र.31 (दि. 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2025) मध्ये यात्रा क्रमांकात, यात्रांच्या प्रतिसीट भाड्यात, दिवसात, दर्शनिय स्थळांंमध्ये कमी-जास्त बदल, सोयी सवलतींमध्ये झालेले बदल यात्रेकरुंवर बंधनकारक असतात.
प्रवासात तक्रार असल्यास-यात्रेदरम्यान कंपनी टूर मॅनेजर, ड्रायव्हर-आचारी महाराज,जेवण,हॉटेल संबंधी, इतर कोणत्याही उणीवा / सुचना असल्यास तेथुनच मोबाईल क्र.७५८८ ४८ ४८ ४८ या क्रमांकावर त्वरित संपर्क करावा. जेणेकरुन यात्रेदरम्यानच आपल्या समस्येचे निराकरण करुन आपणास सेवा देण्यास सुलभ होईल. *माहितीपत्रकात काही सुचना/सुझाव असल्यास मो.७५८८ ४८ ४८ ४८ वर संपर्क साधावा.
यात्रा रद्द करण्याची नियमावली
यात्रेची बुकींग कंपनीच्या कोणत्याही बुकींग कार्यालयात केली गेली असली तरी यात्रा पोस्टपाँड/ कॅन्सल करावयाची असल्यास यासंदर्भात सर्व प्रकारची रिफंडची कार्यवाही नाशिक कॉर्पोरेट ऑफीसमधुनच केली जाते. त्यामुळे यात्रेकरुंना रिफंड मिळणेसाठी नाशिक येथेच लेखी कारवाई करावी लागेल. आपल्याकडील सर्वच कागदपत्रे नाशिक कॉर्पोरेट ऑफीसमध्ये पोहोचल्यानंतर रिफंडसाठी किमान 180 दिवसांचा कालावधी लागतो. यात्रेकरूंनी साचा कोणत्याही कारणास्तव यात्रा/सहल रद्द केल्यास त्याबाबतचा लेखी अर्ज नाशिक कॉर्पोरेट ऑफीसात मिळाल्यानंतर एसआरएच्या एकूण रकमेतून त्या टूरसाठी झालेला विमान, हॉटेल, रोटल येरा इतर खर्च तसेच प्रतिसीट डॉक्युमेंट चार्जस रु.50/- प्रतिसीट वजावट केल राहिलेल्या रकमेतून खालील नियमाप्रमाणे कॅन्सलेशन चार्जेस अशी तिन्ही रक्कम वजावट करून परतावा देण्यात येईल.
बुकींग केलेली यात्रा रद्द करण्याचा दिवस वजा रक्कम परताव्याची रक्कम
1) 31 वा त्यापेक्षा जास्त दिवस असल्यास 35% 65%
2) 0 ते 30 दिवस अगोदर वा यात्रेच्या दरम्यान असल्यास. 100% काहीच नाही.
यात्रा निघण्यापुर्वी यात्रा पोस्टपांड करण्याचा दिवस वजा रक्कम किमान रक्कम
1) 21वा त्यापेक्षा जास्त दिवस असल्यास 5% 200/-
2) 11 ते 20 दिवस दरम्यान असल्यास 7.5% 300/-
3) 3ते 10 दिवस दरम्यान असल्यास 10% 500/-
4) 0 ते 2 दिवस दरम्यान असल्यास 25% 1000/-
यात्रा पोस्टपॉड करावयाची असल्यास एसआरणएच्या एकुण रकमेच्या किमान 35% रक्कम कंपनीकडे जमा असणे आवश्यक आहे.
विदेश यात्रांसाठी कॅन्सलेशन चार्जेस परिस्थितीनुरूप व्हिसा, विमान तिकीट खर्च इ. झालेला
खर्च वजा करून रिफंडचा नियम व कालावधी उपरोक्त लिखीत प्रमाणेच राहील.
***
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
17-12-2024 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
31-12-2024 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
14-01-2025 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
30-01-2025 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
16-02-2025 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
02-03-2025 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
16-03-2025 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
30-03-2025 | ₹ 17265 | ₹ 13205 | ₹ 12521 |
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
18-12-2024 | ₹ 22151 | ₹ 16031 | ₹ 15555 |
04-01-2025 | ₹ 22151 | ₹ 16031 | ₹ 15555 |
20-01-2025 | ₹ 22151 | ₹ 16031 | ₹ 15555 |
05-02-2025 | ₹ 22151 | ₹ 16031 | ₹ 15555 |
21-02-2025 | ₹ 22151 | ₹ 16031 | ₹ 15555 |
10-03-2025 | ₹ 22151 | ₹ 16031 | ₹ 15555 |
26-03-2025 | ₹ 22151 | ₹ 16031 | ₹ 15555 |
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
13-12-2024 | ₹ 18471 | ₹ 13395 | ₹ 12981 |
30-12-2024 | ₹ 18471 | ₹ 13395 | ₹ 12981 |
15-01-2025 | ₹ 18471 | ₹ 13395 | ₹ 12981 |
31-01-2025 | ₹ 18471 | ₹ 13395 | ₹ 12981 |
16-02-2025 | ₹ 18471 | ₹ 13395 | ₹ 12981 |
05-03-2025 | ₹ 18471 | ₹ 13395 | ₹ 12981 |
21-03-2025 | ₹ 18471 | ₹ 13395 | ₹ 12981 |
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
24-12-2024 | ₹ 31935 | ₹ 23141 | ₹ 22421 |
21-01-2025 | ₹ 31935 | ₹ 23141 | ₹ 22421 |
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
24-12-2024 | ₹ 8021 | ₹ 6041 | ₹ 5501 |
24-01-2025 | ₹ 8021 | ₹ 6041 | ₹ 5501 |
21-02-2025 | ₹ 8021 | ₹ 6041 | ₹ 5501 |
21-03-2025 | ₹ 8021 | ₹ 6041 | ₹ 5501 |
Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
---|---|---|---|
12-12-2024 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
19-12-2024 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
26-12-2024 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
02-01-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
09-01-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
16-01-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
23-01-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
30-01-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
06-02-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
13-02-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
20-02-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
27-02-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
06-03-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
13-03-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
20-03-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |
27-03-2025 | ₹ 9011 | ₹ 7301 | ₹ 7121 |